का साजरी केली जाते मकर संक्रांत...!!
का साजरी केली जाते मकर संक्रांत...!! सणांना संस्कृती, परंपरेनुसार ऐतिहासिक महत्व प्राप्त होते. असे अनेक सण आहे ज्यांना धर्माच्या,ग्रंथांच्या, आधारावर नियमानुसार साजरं केलं जातं. मकर महिन्यात कृष्णा पंचमीवर देशातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये मकर सक्रांती वेगवेगळ्या सांस्कृतिक स्वरूपात साजरी केली जाते. का म्हणतात मकर संक्रांती? ' मकर' हा शब्द मकरराशीला संबंधित आहे, तर 'संक्रांती' याचा अर्थ संक्रमण असा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीपासून मकर राशीत प्रवेश करतो. एक राशीला सोडून दुसर्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या वेळेस 'मकर संक्रांती' असे म्हणतात. हिंदू महिन्यानुसार, मकर संक्रांती उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो. उत्तरायन कृष्ण आणि शुक्ल पक्ष या दोन भागानुसार उत्तरायण आणि दक्षिणयान असे वर्षाचे दोन भाग आहेत. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो. उत्तरायण म्हणजे त्या काळापासून पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळतो, त्यानंतर सूर्य उत्तरेकडून निघू लागतो. त्याला सोमयान असेही म्हणतात. उत्...