पोस्ट्स

गरिबी जगायला शिकवते.

इमेज
  गरिबी जगायला शिकवते.     माझ्या प्रिय मना, एक विचारू का? हो विचार की, तुझं कसं आहे ना. तू खरं काही सांगत नाहीस, आणि एका वेळी एक काम धड करीत नाही. निर्णय कधी नीट घेत नाहीस. याचा मला फार राग येतो. आता तू म्हणशील मला राग येण्याचा काय संबंध आहे. हो तेच म्हणतो ना मी, काय संबंध आहे. आ रे वा. संबंध आहे म्हणून तर, विचारतोय ना? बरं विचार काय म्हणणं आहे. हं बोला.......    सकाळी सकाळी आरशा समोर उभा होतो, माझे प्रतिबिंब मला पाहून म्हणत होतं. तुला एक विचारू का? मी म्हटलं विचार, आणि आरसा अंतरीच मन बोलू लागला. मन गत काळातल्या आठवणीत रंगत गेलो. माझा गत काळ म्हणजे, रखरखीत वाळवंट होत. चुकून सुद्धा पावसाचा शिडकावा येण्याची अजिबात शास्वती नाही.बर का.    माझे आई-बाप पैसेवाले नव्हते, तसे ते भिकारी नव्हते, शेती होती पण, असून उपयोग काय. ती कोरडवाहू होती. पाऊस पडल्या शिवाय ती पिकणार कशी. म्हणून रोज उठून लोकांच्या शेतात घरातल्या मंडळींना मोलमजुरीन काम करावं लागे. आणि येईल त्या मजुरीत घर चालवणं म्हणजे तारेवरची कसरत होती. घरात खाण्याची तोंड वाढत चालली होती. पण पैसे कुठून येण्याचं नाव नाही. आयुष्य असं काही वळण घ