श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला सुंदर - पुतळा !!
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला सुंदर - पुतळा !! - या चौरस्त्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला सुंदर असा काळ्याभोर रंगाचा भला मोठा पुतळा होता . घोडा द्खील दोन पाय वर करून , मान उंच करून जणू ऐटीत उभा होता . डावीकडे सरळ वर चढून मारुतीचे देऊळ होते . डावीकडे वळताच देवळाच्या अगोदर काही झोपडपट्टी देखील होती . माझी आपली ऑफिस मध्ये जाण्याची रोजची हीच वाट होती . - नवीन बदलीहून या शहरात येणे झाले तेव्हापासूनच , म्हणजे पहिल्या दिवशीच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मी बघितले होते .आणि तेव्हापासूनच मला या आकर्षक अशा पुतळ्याचे आकर्षण वाटू लागले . अगदी बोलका पुतळा . श्रेष्ठ कलाकाराची श्रेष्ठ कृती आणि श्रेष्ठ कृतीची श्रेष्ठ अभिव्यक्ती ,श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाची जाणीव करवीत होता हा पुतळा . येणाऱ्या जाणाऱ्यांना जणू संवादासाठी निमंत्रणच देत होता . - पहिल्या दिवशी पासूनच मला या पुतळ्याने प्रभावित केले . आणि तेव्हा पासूनच मी स्कूटरवर बसल्या , मान उंच करून गर्वाने रोज महाराजांचे दर्शन घेत असे . मला समर्थ रामदासांचे शब्...