Shiv Jayanti 2021शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा

 

नतमस्तक तया चरणी,

ज्याने केली स्वराज्य निर्मिती,

देव माझा एकच तो...

राजा शिवछत्रपती

तुमचं आमचं नातं काय,

जय जिजाऊ जय शिवराय




छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही, तर मुघलांवर आलेले अस्मानी संकट होते. आपल्यातील कुशाग्र बुद्धिमत्ता, लढवय्येपणा, शूरवीरपणा यांसारख्या गुणांमुळे ते रयतेचे राजे झाले. अशा या पराक्रमी राजाच्या जन्म झाला 19 फेब्रुवारी रोजी. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात 'शिवजयंती' (Shiv Jayanti) म्हणून साजरा केला जातो. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे मोठ्य संख्येने एकत्र न जमता अगदी साधेपणाने तुम्ही ही शिवजयंती साजरी करू शकता. मात्र तुम्हाला दरवर्षी प्रमाणे हा उत्सव साजरा करता आला नाही तरी तुम्ही हताश न होता मेसेजेस (Messages), कोट्स (Quotes), व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. 

शिवजयंती साजरा करणे म्हणजे एकत्र जमूनच ती साजरी केली जावी असे नाही. सामाजिकतेचे भान ठेवून तुम्ही आहे त्या ठिकाणी संदेशाच्या माध्यमातून एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन ती साजरी करू शकता.

स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास

रयतेचे सुख ही एकच होती मनी आस

मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा

असा वाघिणीचा होता तो छावा

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा


'जय शिवराय' या उद्घोषाने

सळसळते मराठ्यांचे रक्त

माणसातल्या 'या' देवाचे

आम्ही सारे आहोत शिवभक्त

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!


मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास

ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती

पोवाडे, गौरव गीतांमधून

आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


जिजाऊंच्या पोटी घेतला ज्यांनी जन्म

त्यांची शूरवीरता कुणीच विसरणार नाही आजन्म

स्वराज्य ही एकच भावना होती ज्यांची मरणाअंती

सर्वांनी मिळून साजरी करु या शिवजयंती

तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा!!


                शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

का साजरी केली जाते मकर संक्रांत...!!

गरिबी जगायला शिकवते.

आई वडिलांना वृद्धश्रमांत ...?