पोस्ट्स

Shiv Jayanti 2021शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा

इमेज
  नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो... राजा शिवछत्रपती तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही, तर मुघलांवर आलेले अस्मानी संकट होते. आपल्यातील कुशाग्र बुद्धिमत्ता, लढवय्येपणा, शूरवीरपणा यांसारख्या गुणांमुळे ते रयतेचे राजे झाले. अशा या पराक्रमी राजाच्या जन्म झाला 19 फेब्रुवारी रोजी. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात 'शिवजयंती' (Shiv Jayanti) म्हणून साजरा केला जातो. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे मोठ्य संख्येने एकत्र न जमता अगदी साधेपणाने तुम्ही ही शिवजयंती साजरी करू शकता. मात्र तुम्हाला दरवर्षी प्रमाणे हा उत्सव साजरा करता आला नाही तरी तुम्ही हताश न होता मेसेजेस (Messages), कोट्स (Quotes), व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.  शिवजयंती साजरा करणे म्हणजे एकत्र जमूनच ती साजरी केली जावी असे नाही. सामाजिकतेचे भान ठेवून तुम्ही आहे त्या ठिकाणी संदेशाच्या माध्यमातून एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन ती साजरी करू शकता. स्वराज्याचा ज्याला लागतो...

Happy Republic Day काय आहे प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व?

इमेज
  भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. अनेकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवसांमधला फरक ठळकपणे विचारला तर सांगता येत नाही. भारताचे नागरिक म्हणून प्रत्येकाला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो, हे माहित असायला हवे. का साजरा होतो प्रजासत्ताक दिन?  भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र १९३० साली २६ जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचे जे अधिवेशन झाले, त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकावण्यात आला. या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचे निश्चित करण्यात आले.  स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवा...

SSC, HSC Exam 2021 : दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर

इमेज
  HSC, SSC EXAM 2021 : दहावी-बरावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला अवघे काही दिवस उरले आहेत. परीक्षांचा तारखा जाहीर झाल्या आहेत. मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या या विषाणूमुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. त्याचप्रमाणे विद्यार्थांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सध्या काही राज्यात कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पण मुंबईत अदयाप शाळा सुरू झालेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना देखील पडला होता.  इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 22 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. तर 29 एप्रिलपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. 12 वीच्या परीक्षेचा निकाल साधारण जुलै महिन्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान होतील तर लेखी परीक्षा 29 एप्रील 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचा निक...

का साजरी केली जाते मकर संक्रांत...!!

इमेज
 का साजरी केली जाते मकर संक्रांत...!! सणांना संस्कृती, परंपरेनुसार ऐतिहासिक महत्व प्राप्त होते. असे अनेक सण आहे ज्यांना धर्माच्या,ग्रंथांच्या, आधारावर नियमानुसार साजरं केलं जातं. मकर महिन्यात कृष्णा पंचमीवर देशातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये मकर सक्रांती वेगवेगळ्या सांस्कृतिक स्वरूपात साजरी केली जाते. का म्हणतात मकर संक्रांती? ' मकर' हा शब्द मकरराशीला संबंधित आहे, तर 'संक्रांती' याचा अर्थ संक्रमण असा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीपासून मकर राशीत प्रवेश करतो. एक राशीला सोडून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या वेळेस 'मकर संक्रांती' असे म्हणतात. हिंदू महिन्यानुसार, मकर संक्रांती उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो. उत्तरायन कृष्ण आणि शुक्ल पक्ष या दोन भागानुसार उत्तरायण आणि दक्षिणयान असे वर्षाचे दोन भाग आहेत. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो. उत्तरायण म्हणजे त्या काळापासून पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळतो, त्यानंतर सूर्य उत्तरेकडून निघू लागतो. त्याला सोमयान असेही म्हणतात. उत्...

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला सुंदर - पुतळा !!

इमेज
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला सुंदर - पुतळा !!  - या चौरस्त्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला सुंदर असा काळ्याभोर रंगाचा भला मोठा पुतळा होता . घोडा द्खील दोन पाय वर करून , मान उंच करून जणू ऐटीत उभा होता . डावीकडे सरळ वर चढून मारुतीचे देऊळ होते . डावीकडे वळताच देवळाच्या अगोदर काही झोपडपट्टी देखील होती . माझी आपली ऑफिस मध्ये जाण्याची रोजची हीच वाट होती .  - नवीन बदलीहून या शहरात येणे झाले तेव्हापासूनच , म्हणजे पहिल्या दिवशीच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मी बघितले होते .आणि तेव्हापासूनच मला या आकर्षक अशा पुतळ्याचे आकर्षण वाटू लागले . अगदी बोलका पुतळा . श्रेष्ठ कलाकाराची श्रेष्ठ कृती आणि श्रेष्ठ कृतीची श्रेष्ठ अभिव्यक्ती ,श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाची जाणीव करवीत होता हा पुतळा . येणाऱ्या जाणाऱ्यांना जणू संवादासाठी निमंत्रणच देत होता .  - पहिल्या दिवशी पासूनच मला या पुतळ्याने प्रभावित केले . आणि तेव्हा पासूनच मी स्कूटरवर बसल्या , मान उंच करून गर्वाने रोज महाराजांचे दर्शन घेत असे . मला समर्थ रामदासांचे शब्...

आई वडिलांना वृद्धश्रमांत ...?

इमेज
आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतांय..? प्रत्येक आई वडिल सतत मुलांबद्दल एक विचार करत असतात कि आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास आपण भोगला हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये. आपले मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेडी आशा घेऊन शहरात असेल तर कापड गिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राब राब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवडीच महत्वाची भूमिका बजावते तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण चार पाच घराची धुनी भांडी किंवा शेतात दिवस भर काम करते. जो तो रात्रदिवस काम करून आपल्या मुलांना लहानांच मोठं करतांना दिसतात. ते आपल्या मुलाला शाळेत घालतात, त्याला चांगले शिक्षण मिळावे त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचं रान करतात अश्यातच त्यांचं आयुष्य जात. मुलं शिकतात कॉलेजला जातात व आपल्या आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट, नवं नवीन कपडे अशी ऐश पेश जीवन जगतो व बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात कि आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल पण आपल्या मुलांचं जीवन चांगले जायला पाहिजे. मुलं चांगली...

विदुषक

इमेज
विदुषक किती वाईट असतं ना जग! आपण ज्यांच्यासाठी राब राब राबलो त्यांच्या डोळ्यांतून आपल्यासाठी दु:खाचा एक थेंबही वाहिला नाही. निदान आपण मेल्यावर तरी आपल्या मुलांनी चार दोन आसवे गाळायला हवी होती. दु:ख अनावर होऊन सेठ चांदीमल सोनामलचा पिंपरणीच्या झाडावर बसलेला आत्मा स्वत:च रडायला लागला. इतक्यात समोरच्या झाडावर काहीतरी खुडबूड झाली. भुताच्या भीतीने चांदीमल सोनामलचा आत्मा जरासा दचकला. आपणही भूतच आहोत या विचाराने तो सावरला. "काय शेठ, जीवंतपणी पैशासाठी रडत होता, मेल्यावरही तुमची रडारड थांबली नाही का?" अलगद त्यांच्या शेजारी येऊन बसलेला आत्मा हसत होता. शेठ चांदीमलने त्याच्याकडे निरखून पाहिलं पण ओळखीची एकही खूण त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. "कोण रे बाबा तू? आणि का माझ्या दु:खावर डागण्या देतोहेस?" चांदीमल शेठचा उदासवाणा चेहरा अधिकच भेसूर दिसत होता. "अहो शेठ, मेल्यावर माणसाला कुठलं आलंय सुख आणि दु:ख?" समोरचा आत्मा अजून हसत होता. "एवढं कोणतं मोठं दु:ख होतं तुम्हाला जे मेल्यावरही तुमची पाठ सोडत नाही." "अरे, काय सांगू तुला? काय का खस्ता नाही खाल्ल्या या दिव...